आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय पुरस्कार:निर्माण फाउंडेशनकडून 75 मान्यवरांचा गाैरव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या ७५ मान्यवर व्यक्तींचा निर्वाण फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती राज्यस्तरीय पुरस्कार व क्रांतिसूर्य जोतिबा फुले जीवनगौरव पुरस्काराने गाैरविले. राेटरी हाॅल येथे आयाेजित कार्यक्रमाच्या प्रारंभी जोतिबा फुले व सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पश्चिम आफ्रिकेतील आरकितानो अर्बिस्ता डझा गॅब्रिएल लोपेस दा सिल्वा, जिल्हा क्षयराेग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, अभिनेता प्रशांत गरुड, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन तसेच संस्थेचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर आदी उपस्थित हाेते.

यावेळी बालगायिका ज्ञानेश्वरी जमधाडे हिने जोतिबा फुले लिखित अखंडाचे गायन केले. तन्मय दोंदे यांनी आपल्या गीतातून फुले आणि सावित्रीमाई यांना अभिवादन केले. शाहीर डॉ. देवानंद माळी, शाहीर कल्पना माळी यांनी आपल्या पोवाड्यातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन संस्थेच्या पदाधिकारी तक्षशीला सोनावणे व तिलोत्तमा बाविस्कर यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन धारणकर, संस्थेचे सचिव राहुल सोनावणे, राहुल बनसोडे आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...