आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आकार तर्फे ७५ वृक्षलागवड

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महाेत्वानिमित्त आकार वेल्फेअर संस्थेतर्फे ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा धाेका निर्माण झाला आहे.

पर्यावरणाचा रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याने संस्थेच्या वतीने हा अनाेखा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते वृ़क्षारोपण करण्यात आले. वनविभागप्रमुख अन्सारी मॅडम यांनी देखील या उपक्रमासाठी माेठी मदत केली.कार्यक्रमातून सामाजिक जाणिवेला साद घातल्याचे आकार फाउंडेशनच्या प्रमुख अनिता पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...