आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध धार्मिक कार्यक्रम:शिंपी समाजातर्फे 752 पणत्या लावत दीपोत्सव

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने कार्तिकी एकादशी व संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त ७५२ पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. जानकीराम व शोभा शिंदे, राम व सुरेखा तुपसाखरे, अशोक व भारती टिभे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. यानिमित्त संत नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकडा आरती, विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

याप्रसंगी प्रसिद्ध कापड व्यापारी सोमनाथ हाबडे, रंगनाथ खंदारे, दत्तात्रय लचके, प्रकाश कल्याणकर, मनोहर टिभे, अरुण पाथरकर, राजेंद्र गणोरे यांच्या हस्ते महापूजा व श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नामदेव महाराजांची आरती, पांडुरंगाची आरती, विठ्ठल नामाच्या व नामदेव महाराजांचा जयघोष करण्यात येऊन समारोप पसायदानाने झाला. महाप्रसादाचे वाटप करून संत नामदेव महाराज यांच्या जयंती उत्सवाची सांगता झाली. संतशिरोमणी नामदेव महाराज युवा सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सुहास भांबारे, उपाध्यक्ष नंदकुमार लचके, चिटणीस प्रदीप लचके, अमोल लचके, संतोष टिभे, बळीराम शिंदे, जयवंत खांबेकर, बंडू लचके, सुभाष वारे, रवींद्र हाबडे, प्रकाश खंदारे, गणेश टिभे, तुषार भांबारे, ज्ञानेश टिभे, पंकज शिंदे, सुनिल टिभे, रामेश्वर भांबारे, मयूर भांबारे, विश्वेश टिभे, स्वप्नील खंदारे, संतोष कोडिलकर, संजय लचके, वरद लचके, समर्थ लचके, वेदांत भांबारे, आराध्य भांबारे, शामाबाई लचके, सुरेखा खंदारे, अरुणा शिंदे, सुशीला टिभे, रेणुका सदावर्ते पुष्पा लचके, शकुंतला लचके, छाया लचके, पूनम टिभे, माधुरी लचके, सविता हाबडे, सुनीता शिंदे, रेखा करमासे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...