आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:तंत्रप्रदर्शनात 78 विद्यार्थ्यांनी सादर केले नावीण्यपूर्ण प्रकल्प

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून नावीन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन गुरुवारी (दि १) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध २६ संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ७८ प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कृतिशील सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे आयटीआयचे उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी सांगितले. यामध्ये यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम, आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी नावीन्यपूर्ण संकल्पनेतून अनेक मॉडेल्स तयार केले होते. शेरिन ऑटो लिमिटेडचे संचालक पद्माकर देवरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख सुधीर पाटील, डी.टी. दरगुडे, बाळू जाधव, जे. के. पाटील, उपसंचालक रवींद्र मुंडासे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...