आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामांगीतुंगी येथे साकारलेल्या ऋषभदेव भगवान महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यात सोमवारी (२० जून) भगवान ऋषभ देवाच्या चरणी ८ फूट उंच श्रीफळ अर्पण करण्यात आले. गणिनी आर्यिका ज्ञानमती माताजीनी हस्तिनापूर येथून ऑनलाइन उपस्थित राहून या श्रीफळाची प्रशंसा केली.स्व. आमदार जयचंद कासलीवाल यांनी मूर्ती निर्माणासाठी विशेष योगदान दिले आहे. भूषण कासलीवाल यांनी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खूप मेहनत घेतली. आता त्यांची तिसरी पिढी या क्षेत्रासाठी योगदान देत आहे. त्याची मुले आरुष व कवीश यांनी खाऊच्या पैशांतून १००८ नारळ वापरून या श्रीफळाची निर्मिती केली. वीर सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी श्रीफळ निर्मितीसाठी श्रमदान केले. जमिनीपासून २५०० फूट उंच १००८ नारळ, फॅब्रिकेशन मटेरियल व अनेक वस्तूंवर नेण्याचे काम काम केले. स्टँडवर नेण्यासाठी विशेष क्रेन लावावी लागली. त्यासाठी श्री १०८ मूर्ती निर्माण समिती, ऋषभगिरीचे विशेष सहकार्य लाभले. रवींद्र कीर्ती स्वामीजी यांनीही मार्गदर्शन केले.अभिषेकानंतर १००८ नारळांचा वापर करून तयार करण्यात आलेले श्रीफळ भगवान ऋषभदेवांना अर्पण करण्यात आले. त्याची नोंद अमेझिंग वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये करण्यात येणार आहे. त्याच्या परीक्षणासाठी अमेझिंग वर्ल्डची टीम २ दिवसांनी मांगीतुंगी येथे येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.