आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची गैरसाेय‎:आडगाव भागात 8 तास वीज‎ खंडित, नागरिकांची गैरसाेय‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आडगाव परिसरात रविवारी (दि.‎ ५) सकाळी ९ ते सायंकाळी ५‎ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित‎ झाल्याने नागरिकांचे विशेषत:‎ शेतकऱ्यांचे हाल झाले. वीज‎ नसल्याने गव्हाच्या पिकाला पाणी‎ देता आले नाही. तसेच सुट्टीच्या‎ दिवशी मनोरंजनाचे साधन बंद‎ असल्याने नागरिकांनी वीज वितरण‎ कंपनीवर नाराजी व्यक्त केली.‎ आडगाव वीज वितरण‎ कार्यालयाशी याबाबत संपर्क‎ साधला असता एक फेज लोड घेत‎ नसल्याने वीजपुरवठा खंडित‎ झाल्याचे सांगण्यात येते होते.

मात्र‎ याच वेळी दुसरा फेजवरील‎ वीजपुरवठा सुरळीत असल्याने‎ वीज वितरण कंपनीकडून‎ नागरिकांना संभ्रमात टाकले जात‎ होते. अशीच परिस्थिती‎ गावठाणातही होती. सकाळी ९‎ वाजेपासून गावठाणातील‎ वीजपुरवठा खंडित झाल्याने‎ नागरिकांचे हाल झाले.‎ आडगाव शिवारातील विंचुरगवळी‎ परिसर, सय्यद पिंप्री रोड, लेंडी‎ नाला परिसर, जुना जानोरीरोड,‎ महामार्ग परिसरात वीजपुरवठा‎ खंडित झाला होता. वीज वितरण‎ कंपनीच्या अनागोंदी कामाचा‎ फटका नागरिकांना तसेच‎ शेतकऱ्यांना बसत असल्याने‎ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...