आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुकीचा गुन्हा:कर्ज हप्ते थकवत बँकेची 8 लाखांची फसवणूक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज असलेल्या वाहनावर बँकेचा बोजा न चढवता कर्जाच्या हप्त्यांची परतफेड न करता बँकेची ८ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारमालक व कार घेणाऱ्या संशयितांच्या विरोधात उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापक आरती शेठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सय्यद निहाद नुरुद्दीन (रा. भाभानगर), विशाल सुरेश धोंगडे (रा. बोधलेनगर) यांनी संगनमत करत संशयित विशाल धोंगडे यांच्या कारवर (एमएच १५ जीएफ ५०१३) देवळाली व्यापारी बँकेचे ७ लाख १८ हजारांचे कर्ज आहे. ही कार संशयित धोंगडेने सय्यद यांना विक्री केली. सय्यद यांनी एचडीएफसी बँकेच्या बोधलेनगर शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेकडून संशयित सय्यद आणि धोंगडे यांच्या सहमतीने कर्ज मंजूर केले. धोंगडेने देवळाली बँकेत कार लोनचे पूर्वीचे कर्ज २०१९ मध्ये परस्पर अदा केले. एचडीएफसी बँकेने वाहनावर कर्जाचा बोजा चढवण्यासाठी दोघा संशयितांना नोटीस पाठवली होती. संशयित सय्यदने कर्जाचे एक लाख ७९ हजार रुपये थकीत ठेवत बँकेच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करत आठ लाख ४६ हजाराची फसवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...