आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून १ मे ते ८ जून या ३९ दिवसांच्या कालावधीत परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ८ खून, ५ प्राणघातक हल्ले आणि ३८ हाणामारीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. वाढते गुन्हे रोखण्यास पोलिस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी २१ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताना शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र, २० दिवसांत शहरात खुनाची मालिका सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
खुनाची मालिका { १६ मे : आडगाव येथे पतीने पत्नीचा खून { १९ मे : म्हसरुळला मित्राच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरुणाचा गेला जीव. {२० मे : गंगापूररोडवर मित्रांकडून मित्राचा खून. {२० मे : पंचवटीत बापाने मुलाचा गळा कापून जिवे मारले. {२० मे : एसी दुरुस्ती करणाऱ्याचा खून. {२८ मे : मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राचा खून. {१ जून : आईवरून शिव्या दिल्याने मित्राने मित्राला भोसकले. {७ जून : अंबडमध्ये कंपनी व्यवस्थापकाचा खून.
गुन्ह्यांची ३६ काही तासांत उकल आठ गुन्ह्यांची पोलिसांनी काही तासांत उकल केली. या गुन्ह्यातील सर्वच संशयित आरोपींना पकडण्यात यश आले आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसी दुरुस्त करणाऱ्या कारागिराचा खून हा क्षुल्लक कारणावरून झाला आहे. संशयितांचा गाडीचा धक्का लागल्याने मयताने त्यांना हटकले होते. संशयित मित्रांना बोलला, तुमच्यासमोर माझा अपमान केला. तुम्ही काहीच केले नाही. तिघांनी या इसमावर शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
शहरात प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी असे... प्राणघातक हल्ल्याचे म्हसरुळ १, नाशिकरोड १, पंचवटी २, आडगाव १ असे ५ गुन्हे आणि ३८ हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक हाणामारीचे गुन्हे पंचवटी १०, अंबड ७ नाशिकरोड ७, मुंबईनाका ५, देवळाली कॅम्प ५, भद्रकाली ४, गंगापूर ४, उपनगर ३, म्हसरुळ ३, आडगाव २.
पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर, ९२८ जणांवर कारवाई गुन्हे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. २ मेपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशनचा धडाका सुरू असून २ मेला विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ९२८ टवाळखोरांसह तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे असलेल्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचा वचक नाही परिमंडळ १ व २ मधील उपआयुक्त, ४ विभागांचे सहायक आयुक्त आणि १३ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक गुन्हे रोखण्यासाठी अपयशी ठरले असल्याचे वाढत्या गुन्ह्यांतून निदर्शनास येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.