आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव BHR पतसंस्थेतील 800 काेटींचा घाेटाळा:अटकेतील अवसायक जितेंद्र खंडारेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील 7 राज्यांमध्ये 250 पेक्षा जादा शाखांचाविस्तार असलेल्या जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात 'बीएचआर' यानावाजलेल्या पतसंस्थेत संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे सुमारे 800 काेटींचा अपहार उघडकीस आला आहे. या घेाटाळ्यात अटकेतील संशयित अवसायक जितेंद्र गुलाबराव कंडारे याने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने ताे फेटाळला. त्यामुळे कंडारे याचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

बीएचआर पतसंस्था अवसायनात नोव्हेंबर 2015 मध्ये तत्कालीन सरकारने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. पतसंस्थेने वाटलेल्या कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या होत्या. मात्र, जप्त केलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणाऱ्या सुमारे 900 कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे आवश्यक हाेते. परंतु, अवसायक कंडारे याने संशयितशी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी पुणे येथील शिक्रापूर पेालिस ठाण्यात व रज्यभरात ठिकठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आर्थिक गुन्हा शाेध पथकाने सापळे रचून ठिकठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले हाेते. यामध्ये प्रकाश जगन्नाथ वाणी, सुनिल देवकीनंदन झंवर, रा. सुहास कॉलनी, जळगाव, महावीर माणिकचंद जैन, अजय नंदलाल राठी, आदिनाथ निवास कोटवळ टिळकवाडी, नाशिक व विवेक देविदास ठाकरे (रा. महाबळ काॅलनी), जळगाव,अजय ललवाणी, उदय कांकरीया भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे ऑडीट करणारे धरम सांकला यांना टप्पयाटप्यान अटक केली हाेती.

यामध्ये संशयित जितेंद्र गुलाबराव कंडारे यांचेविरोधात व इतर आरोपी विरोधात पुरावा झाल्याने त्यांचेविरोधात 22 मार्च 2022 रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्हयात शेकडाे गुंतवणुकदार / ठेविदार यांची सुमारे 4 काेटी 54 लाख 71 हजार 516 फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष सरकारी वकीलांकडून जेारदार विराेध

राज्यभरात गाजलेल्या व गाेरगरीब कष्टकऱ्याच्या ठेवी असलेल्या पतसंस्थेचा सुमारे 1 हजार काेटींच्या या घाेटाळ्यात संशयित कंडारे वगळता सर्वच इतरांचा जामीन मंजूर झाल्याने ते कारागृहात बाहेर आहेत. याच अनुषंगाने सदर खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केलेले अ‌ॅड. शिशिर हिरे यांनी कंडारे यांच्या जामीनाला जाेरदार विराेध दर्शविला. त्यात कंडारे हे सरकारी नोकर असताना देखील त्यांनी गुन्हा करण्यास मदत केली.संस्थेच्या मिळकर्ती व तारण मालमत्ता किरकाेळ किंमतीत विकल्याचे सबळ पुरावे देखील सादर केले. तसेच, जामीन मंजूर केल्यास ठेवीदारांच्या रक्कमा परत मिळणार नसून त्यांच्यावर अन्याय हाेईल, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वादग्रस्त चव्हाण यांच्या जागी हिरे यांची नियुक्ती झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...