आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:जिल्ह्यात 800 तर राज्यभरात 31,472 शिक्षकांची पदे रिक्त ; अशैक्षणिक कामांच्या भाराने शिक्षक नाराज

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरगरीब, शेतकरी.,शेतमजुरांसह वंचित घटकांतील विद्यार्थी जि. प. सह सर्वच सरकारी शाळेतून शिक्षण घेतात. परंतु त्यांना अपेक्षित शिक्षणासाठी मात्र सरकारी धोरणांवर विसंबून रहावे लागत आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील ८०० तर राज्यातील जि.प. महापालिका व नगरपरिषदांच्या शाळांमधील ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आरटीइ सर्वेक्षणात समोर आली आहे. विशेष म्हणजे आधीच अनेक शिक्षकांवर दोन-दोन शिक्षकांचा भार असताना अशैक्षणिक कामांमुळे मूळ अध्यापनाच्या कामाला अपेक्षित न्याय देणे शक्य होत नसून, शिक्षकच नसतील तर विद्यार्थी शिकणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे. या नियमानुसार सध्या राज्यात ३१ हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित खासगी शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत ३१ हजार ५७२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अनुदानित खासगी शाळांमध्ये २५ हजार जागा रिक्त आहेत.

शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे जास्त राज्यातील अनेक शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षक असल्याने त्यांना बहुवर्ग अध्यापन करावे लागते. त्यात शालेय पोषण आहार, बांधकामे, बीएलओ मतदार नोंदणी, वेळोवेळी ऑनलाइन माहिती, बैठका, इ-पीक पाहणी, वाहतूक नियोजन करणे अशी कामे वाढत असल्याने शिक्षकांची मानसिकता बिघडत आहे, असर आरोप शिक्षक संघटनांनी केला.

मराठी, उर्दूची १८ हजार पदे रिक्त राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांत मराठी शाळांतील १६,७४८, उर्दू शाळांमधील १,३०९ जागांचा समावेश आहे. कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती या भाषांच्या शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश पदांवर गुरुजींचीच प्रभारी नियुक्ती करून कारभार सुरू आहे. परिणामी अध्ययनावर परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...