आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व शांतीसाठी प्रार्थना:‘विहंगम योग’च्या विश्‍वशांती‎ महायज्ञात 8000 भाविक‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकरोडवरील विहंगम योग ‎ संस्‍थान, महाराष्ट्र राज्‍य व‎ नाशिक शाखा यांच्‍या संयुक्त ‎ विद्यमाने सुरू असलेल्या सत्संग ‎ सोहळ्यात रविवारी १००१ कुण्डिय ‎ विश्‍व-शांती वैदिक महायज्ञ‎ झाला. एका हवनासाठी चार‎ जणांनी यजमान म्हणून उपस्थिती ‎ लावल्याने जवळपास आठ हजार ‎ भाविकांनी यज्ञात सहभागी हाेत ‎ विश्‍वशांतीसाठी प्रार्थना केली.

या ‎ साेहळ्याला अमेरिका,‎ आॅस्ट्रेलियासह सात देशांतील‎ भाविक सहभागी हाेते.‎ ऋषीमुनींचे वास्‍तव्‍य असलेली‎ नाशिक ही तपोभूमी असून, प्रभू‎ श्रीरामचंद्र यांच्‍या पदपर्शाने पावन‎ झालेली आहे. संताचे सान्निध्य,‎ स्‍वाध्याय आणि जीवाशी ब्रह्मचा‎ संबंध जोडणारा योगा असे‎ सत्‍संगाच्या तीन श्रेणी आहेत. हेच‎ महत्त्‍वाचे कार्य विहंगम योग‎ संस्थान अविरतपणे करत‎ असल्‍याचे प्रतिपादन सद्‌गुरू‎ आचार्य श्री स्‍वतंत्रदेवजी महाराज‎ यांनी यावेळी मार्गदर्शन करताना‎ केले.‎

धार्मिक सोहळ्यात उपस्‍थित‎ संत श्री विज्ञानदेवजी महाराज‎ आणि सद्‌गुरू आचार्य श्री‎ स्‍वतंत्रदेवजी महाराज यांचा‎ आंतरराष्ट्रीय संत श्री किशनलाल‎ शर्मा, प्रमुख आयोजक योगेश‎ पाटील (गडाख), विवेक पाटील‎ (गडाख), जयंत होनराव, समीर‎ पाटील, संतोष पाटील, सुधांश ‎ पाटील, शिव त्रिपाठी आदींनी ‎ सत्‍कार केला. सोहळ्याला‎ उपस्‍थित गुरू माताजींचे पूजन ‎ प्रमिला पाटील, नेहा रायरीकर, ‎ शिल्पा शर्मा, स्नेहलता मोरे,‎ ज्योती पाटील यांनी केले. ‎ रविवारच्‍या कार्यक्रमाची सुरुवात ‎ सद्‌गुरू आचार्य श्री स्‍वतंत्रदेवजी ‎ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण ‎ करून झाली. स्थानिक ‎ स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.‎

२० हजारांवर भाविकांना‎ महाप्रसाद‎
शनिवारी सुरू झालेल्या या समागम‎ साेहळ्याकरीता १० हजार‎ भाविकांसाठी सुविधा उभारण्यात‎ आली हाेती. जवळपास १ हजार‎ हाॅटेल्सच्या रुम्स बुक करण्यात‎ आलेल्या हाेत्या. उत्तर प्रदेश,‎ गुजरात, महाराष्ट्रातून साधक आले‎ हाेते. दाेन दिवसांत किमान २० हजार‎ भाविकांनी येथे महाप्रसाद घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...