आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविप्र संस्थेत कॅम्पस् इंटरव्ह्यू:इंजिनिअरिंगच्या 82 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत राेजगार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र संस्थेच्या पॉलिटेक्निकमधील अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नाॅलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेतील ८२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आघाडीची कंपनी धुत ट्रांन्समिशन प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद यांनी ८२ विद्यार्थी निवडले. त्यांना वार्षिक एक लाख ६० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले. या कॅम्पस ड्राइव्हमध्ये एकूण १७० विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला. कंपनीचे एच.आर. मॅनेजर सुरेश आवटे यांनी कंपनीचे सादरीकरण केले, त्याचबरोबर निवड झाल्यानंतर तिथे मिळणाऱ्या सुविधांची सर्व माहिती दिली. प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुखांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...