आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:85 पक्षांना ‘आघाडी’चा मोह, 13 पक्षांना ‘सेना’ची भुरळ!, राज्यात 4 महिन्यांत 30 नवे पक्ष

नाशिक | सचिन जैन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमध्ये राज्यात ४१ नवीन पक्षांनी जन्म घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदलेल्या राजकीय पक्षांची संख्या ३१३ च्या घरात गेली असून त्यात "आघाडी' शब्दाचा समावेश असलेल्या ८५, तर "सेना' शब्दासह नोंदल्या गेलेल्या १३ पक्षांचा समावेश आहे. सत्ताबदलात "महाआघाडी'चा चमत्कार झाल्यावर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तोच फॉर्म्युला लागू करण्यासाठी स्थानिक राजकारण सक्रिय झाले आहे. अनोंदणीकृत पक्षाची संख्या पोहोचली ३३० वर

1 राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष ६ आणि प्रादेशिक पक्ष २ आहेत.

2 राज्याच्या राजकारणात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष सक्रिय असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक संदर्भ व समन्वय महत्त्वाचा मानला जातो. याच उद्देशाने "आघाडी' आणि "सेना' या नावांसह अनेक पक्षांची नोंदणी करण्यात आली आहे.

3 विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात ४१ पक्षांची नोंदणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अवघ्या चारच महिन्यांत ३१ पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनोंदणीकृत पक्षाची संख्या ३३० वर पोहोचली आहे.

कोरोनाकाळात ४१ पक्ष
२०२० या काळात लाॅकडाऊन करण्यात आले आले होते. मात्र या कालावधीत राज्यात ७ नव्या पक्षाची नोंदणी झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात तब्बल ३४ नव्या पक्षांची नोंदणी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...