आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:थकीत अनुदानासाठी नामांकित इंग्रजी शाळा ट्रस्टीचे 8 ला आंदोलन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची योजना सुरू केली आहे. परंतु शासनाने त्यापोटी देय असलेले पैसेच दिले नसल्याने अखेर या राज्यातील असाेसिएशनने दिवाळीनंतर वसतिगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेत आता अनुदानासाठी ८ नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषण करत तीव्र आंदोलनाचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे ६० हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

असोसिएशनने पोलिस, जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयासह आदिवासी आयुक्तांनाही निवेदन देत त्याची पूर्व सूचनाही देण्याची तयारी केली आहे. संस्थाचालकांची नुकतीच नाशिकमध्ये बैठक झाली. त्यात आंदोलन करण्याचा अन् त्याबाबत तारीख निश्चितीचा निर्णय झाला. आता मात्र नेमकी पुढील भूमिका काय असेल याबाबत नियोजन सुरू झाले आहे. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यावर योग्य निर्णय न झाल्यास मंत्रालयात सचिवांना, मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले जाईल. न्याय मिळेपर्यंत वसतिगृह सुरू केले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...