आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:ओझर मर्चंट बँकेच्या चार जागांसाठी 9 उमेदवार

ओझरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर मर्चंट को-ऑप. बँक निवडणुकीत सर्वसाधरण गटाच्या १४ जागांसाठी १४, भटक्या विमुक्त गटाच्या एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने या जागांच्या अविराेध निवडीची आैपचारिकता बाकी आहे. मात्र, महिला राखीव २ जागांसाठी चार, इतर मागासप्रवर्गाच्या एका जागेसाठी दाेन तर अनुसूचित जाती/जमातीच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. १३ नोहेंबर रोजी मतदान होणार असून १४ नाेव्हेंबरला निकाल जाहीर हाेणार आहे. बँकेच्या १९ जागांपैकी १५ जागांवर अविराेध निवड हाेणार असली तरी बँकेच्या सत्तेच्या चाव्या या जागांच्या निवडीवरच अवलंबून आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांची नेमणूक करण्यातआली आहे. एकूण ४ जागांसाठी दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गत निवडणूक अविरोध झाल्याने तब्बल १० वर्षांनंतर सभासदांना यावेळी मतदानाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद हे पाच जिल्हे तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक, चांदवड या पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचे १० हजारांच्या आसपास सभासद आहेत. निफाड तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...