आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझर मर्चंट बँक निवडणूक:4 जागांसाठी 9 उमेदवार उतरणार रिंगणात; 13 नोहेंबरला मतदान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक सह सहा जिल्हे आणि पाच तालुके कार्यक्षेत्र असलेल्या ओझर मर्चंट को-ऑप. बँकेची 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच सर्वसाधरण गटात 14 जागेसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल असल्याचे त्या जागा बिनिरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून भटक्या विमुक्त जाती साठी एक जागेसाठी एकच अर्ज असल्याने तीही जागा बिनविरोध होणार आहे.

तसेच महिला राखीव 2 जागा साठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासप्रवर्गात एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. तसेच तीन गटांसाठी 4 जागेसाठी 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

13 नोव्हेंबरला रोजी मतदान होणार असून पुढील काळातील पाच वर्षासाठी सत्ता कोणाची येणार याचे गणित यावर अवंबून आहेत. निफाड तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असल्याने निफाड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुक अधिकारी म्हणून प्रेरणा शिवदास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नासिक यांची नेमणुक करण्यात आली आहे.

सदरील एकूण 4 जागांसाठी 13 नोव्हेंबरला सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याने तब्बल 10 वर्षांनंतर सभासदांना यावेळी मतदानाची संधी मिळण्याची शक्यता असून, संस्थेचा संचालक होण्यासाठी यावेळेस तरुण वर्ग तयारीत आहे.

नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद हे पाच जिल्हे तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक, चांदवड या पाच. तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचे 10 हजारांच्या आसपास सभासद असलेल्या तसेच मोठा डामडौल असलेल्या या बँकेसाठी संचालक मंडळातील 19 जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी 14, अनु.जाती जमातीसाठी एक, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागास प्रतिनिधी एक, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी एक अशा 19 संचालकांच्या जागांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.

बँकेच्या इतिहासात प्रथमच मागील पंचवार्षिक निवडणुकी बिनविरोध केली होती. त्यात काही चुकीच्या लोकांचा प्रवेश झाल्यामुळे बँकेची आर्थिक प्रगती खुंटली. त्यामुळे सभासदांच्या आग्रहास्तव ही निवडणुक सभासदांच्या हातात देऊन आम्ही निवडनूकीला सामोरे जात आहोत.

- विजय भिकाजी शिंदे, मा चेअमन ओमको

बातम्या आणखी आहेत...