आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग होणार प्रकाशमय:नऊ कोटी खर्चाला मंजुरी 50 किलोमिटर अंतरात 924 विजेचे पोल उभारणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून विजेचे 924 पोल उभारण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता महामार्ग प्रकाशमय होणार असून रात्रीच्या अंधारात हकनाक होणारे अपघात टळणार आहे.

शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमय व्हावेत यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक - आग्रा महामार्गावर विजेचे पोल फारच कमी व सतत बंद स्थितीत असल्याने असल्याने महामार्गावर कायमच लहान, मोठे अपघात होत असतात. पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणावर वाढ होत असते. या अपघातामुळे काहींनी जीव गमवीलेला असून अनेकांच्या वाटयाला कायमचेच अपंगत्व आलेले आहे. अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील प्रवाशांना लुटल्याच्या अनेक घटना घडतच असतात. हि विदारक परिस्थिती टाळण्यासाठी महामार्गावर प्रखर उजेड घेणाऱ्या एलईडी असावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहर परिसरातील मुंबई -आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल फ्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदिपे बसविण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी 8 कोटी 76 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे .नाशिक शहर परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गाच्या 40 किलोमीटर अंतरावर दोनही बाजूच्या सर्व्हिसरोडसह 544, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या दहा किलो मीटरच्या अंतरावर 322 तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर 58 प्रखर प्रकाश देणारे एलईडी पथदिवे नव्याने बसविण्यात येणार आहे. या निधीतूनच देखभालही करण्यात येणार आहे.

या निधीतून एकूण 50 किलोमीटर अंतरात 924 विजेचे पोल उभारण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या विजेच्या पोलमुळे शहर आणि परिसरातील महामार्ग प्रकाशमय होणार असून अपघातांचे प्रमाण अत्यल्प होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...