आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडी मार्ट फाउंडेशनच्या वतीने पालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहेे. याअंतर्गत संस्थेच्या वतीने पालिकेच्या ४ हजार विद्यार्थी प्रवेश श्रमता असलेल्या नऊ शाळा स्मार्ट करण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत या शाळेतील संगणक, वाचनालय कक्षासह युवा अनस्टॉपेबलमार्फत विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे उदघाटन पालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. पाच वर्षांसाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक शाळेत २१ संगणक, सुमारे २००० पुस्तके, फर्निचर, बोलक्या भिंती आणि इमारतीच्या दर्शनीय भागाचे रंगकाम करण्यात आले आहे. एकूण १७ तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली असून त्यातून वाचन संस्कृतीसाठी प्रयत्न केले जातील. नंतरच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे महत्व पटवून दिले जाईल.
मनपा शिक्षण विभागाकडून स्मार्ट स्कूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सदर प्रकल्पांतर्गत प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत डी मार्ट फाउंडेशन (सी. एस. आर) यांच्या सहयोगाने नऊ शाळांसाठी संगणक कक्ष आणि वाचनालय कक्ष विकसित करून डिजिटल लर्निंग प्रोग्राम व रीडिंग प्रोग्राम उपक्रम राबविण्यात येत असल्याने गरजू विद्यार्थ्यांत आनंद आहे.
स्मार्ट गर्ल उपक्रमात विद्यार्थिनींनी बेधडकपणे मांडले विविध प्रश्न
पालिकेच्या शाळेत किशोरवयीन मुलींसाठी स्मार्ट गर्ल हा अनोखा उपक्रम भारतीय जैन संघटननेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी विद्यार्थिनी, पालकांसोबत संवाद साधला. विद्यार्थिनींनी ज्या आत्मविश्वासाने आपले अभिप्राय मांडले, त्याचे आयुक्तांनी कौतुक केले. याचा फायदा नऊ शाळांमधील सुमारे ४००० विद्यार्थ्यांना होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांत वाचनाची गाेडी निर्माण केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.