आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामाच्या घराचा पत्ता हरवला:9 वर्षीय मुलगी रस्ता चुकल्याने अनोळखी परिसरात, महिला बीट मार्शलने एक तासात लावला पालकांचा शोध

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

मामाकडे आलेली 9 वर्षीय मुलगी रस्त्या चुकल्याने पेठरोडवर आली. म्हसरुळ पोलिस ठाण्याचे महिला बिट मार्शलने एका तासाच्या आत तिच्या पालकांचा पत्ता शोधला. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता पेठरोड येथे हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुसावळ येथील राहणारी पूर्वी मनोज सोनवणे वय 9 ही मुलगी तिचे मामा विजय धिवरे (रा. चुंचाळे अंबड) यांच्याकडे आली होती. दुपारी 2 वाजता तीच्या मामाचे दोन मुलांसोबत फुलेनगर येथे दुसऱ्या मामाच्या घरी आली होती. दुपारी सर्व भावंडे खेळत असताना ही मुलगी फुलेनगरचा रस्ता चुकली आणि पेठरोडकडे पायी चालत आली. रस्ता चुकल्याने मुलगी रस्त्याच्या कडेला रडत बसली होती. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल वैशाली बोराडे यांना ही मुलगी दिसून आली. त्यांनी मुलीकडे जाऊन तीची विचारपुस केली.

पत्ता सांगता येत नव्हता

मुलीने तीचे नाव सांगितले. मात्र, पत्ता सांगता येत नव्हता. सायंकाळी 4 वाजता मुलीचे मामा यांनी फुलेनगर पोलिस चौकीत भाची बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मुलगी बेपत्ता झाल्याने पंचवटी पोलिस शोध घेत असताना मुलगी म्हसरुळ पोलिसांना मिळून आल्याची माहिती मिळाली. पंचवटी पोलिसांनी मुलीचे मामा धिवरे यांना सोबत घेत म्हसरुळ पोलिस ठाण्यात नेले. मुलीची ओळख पटल्यानंतर मुली त्यांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ निरिक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासांत मुलीचा शोध घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...