आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात 91  स्काउट्स

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील १४ शाळांतील ९१ स्काउट्स विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील काचुर्ली अनुदानित आश्रमशाळेत आयोजित चार दिवसीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात सहभाग घेतला. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक अशा ३० प्रकारच्या चाचण्या शिबिरात घेण्यात आल्या. मुंबई येथील कार्यालयाद्वारे अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाइड्स यांच्या मान्यतेने आणि नाशिक भारत स्काउट्स-गाईड्स, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सहकार्याने शिबिर पार पडले. मुख्याध्यापक गौतम कटारे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा संघटक राजेंद्र महिरे यांच्यासह विविध शाळांतील स्काउट पथकांचे युनिट लीडर्स उपस्थित होते. जिल्हा स्काउट प्रशिक्षण आयुक्त नवनाथ वाघचौरे, एस. एम. पाटील, ईश्वर वाघ, विलास गोसावी, मनोज तुसे, संजय कोंटूरवार परीक्षक हाेते.

राष्ट्रीयस्तरावर प्रविष्ठ हाेण्याची संधी
राज्य पुरस्कार चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या स्काउट्स विद्यार्थ्यांना मुंबई येथे राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. याशिवाय राज्य पुरस्कार चाचणी उत्तीर्ण स्काउट्सला राष्ट्रीयस्तरावरील राष्ट्रपती स्काउट्स पुरस्कार चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी मिळते.

बातम्या आणखी आहेत...