आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये हाेणार हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्यापही सरहदने माघार घेतली नसून आमचे नाव लावू नका, राज्य शासनाचा निधीही आम्हाला नकाे, पण विविध कारणांनी दिल्लीत हाेत असलेली मराठी भाषेची गळचेपी दूर करण्यासाठी संमेलन दिल्लीतच घ्यावे यासाठी आम्ही अजूनही आग्रही असल्याचे सरदहचे संजय नहार यांनी ‘दिव्य मराठी’ सांगितले.
यंदाचे संमेलन हे छाेटेखानी हाेणार असून त्यासाठी नाशिकच्या लाेकहितवादी मंडळाच्या निमंत्रणावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे. यासाठी गुरुवारी (दि. ७) साहित्य महामंडळाची स्थळ पाहणी समितीही नाशिकमध्ये दाखल हाेणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्येच संमेलन हाेणार यावरही माेहर लागू शकते. या पार्श्वभूमीवर संजय नहार म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मराठी भाषेचे विविध प्रश्न केंद्र शासनापर्यंत जवळून पाेहाेचावे. शिवाय दिल्लीत संमेलन व्हावे ही आमची खूप जुनी मागणी आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी दिल्लीचाच विचार करावा. पदाधिकाऱ्यांनी थाेड्या अलीकडच्या तारखांना घेणार असाल तर दिल्लीत करू असे सांगितले हाेते. पण, १ मे हा महाराष्ट्र दिन आहे, पुढे २ तारखेला लगेच सुटी आहे. या काळात दिल्लीतील वातावरणही चांगले असते. १५ मेनंतर दिल्लीत ऊन लागायला सुरुवात हाेते. काेराेनाचा जाेरही आेसरेल असा सगळा विचार करून आम्ही १, २, ३ मे राेजी दिल्लीत संमेलन घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अजूनही महामंडळ अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी दिल्लीचा विचार करावा, अशी मागणी आहे.
नाव नकाे, पैसाही नकाे
दिल्लीत संमेलन घेण्यासाठी निमंत्रक म्हणून आम्हाला आमच्या सरहद संस्थेचं नाव नकाे, लाेकहितवादी मंडळाचेच नाव ठेवा. राज्य शासनाकडून मिळणारा निधीही आम्हाला नकाे. भीमथडीच्या तट्टानाला यमुनेचे पाणी पाजा... या आेळी प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ असल्याने आम्ही साहित्य संमेलनासाठी आग्रही आहाेत. - संजय नहार, सरहद
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.