आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
साहित्य संमेलनासाठी तसेच ते कुठे आहे याची आेळख दर्शवतं ते बाेधचिन्ह वा लाेगाे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, संमेलनाध्यक्ष- स्वागताध्यक्ष मिळाले, निधी मिळाला तरी लाेगाेचे भिजत घाेंगडे असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केल्यावर आयाेजकांना जाग आली आणि सामान्यांना खूपच समजून घ्यावा लागेल अशा बाेधचिन्हाचे अखेरीस शनिवारी (दि. ३०) अनावरण करण्यात आले.
नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व कामे हाेत असताना लाेगाेचे भिजत घाेंगडे आयाेजक काही वाळत घालेना यासंदर्भातील वृत्त दिव्य मराठीत प्रसिद्ध झाल्यानंतर आता आलेल्या लाेगाेंपैकी एकावर शिक्कामाेर्तब करून ताे प्रसिद्ध करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या घाेषवाक्य आणि बाेधचिन्ह स्पर्धेत फक्त ५३ जणांनी सहभाग घेतला. त्यातून काेल्हापूर येथील अनंत गाेपाळ खासबारदार यांच्या लाेगाेवर त्यासाठी नेमलेल्या संजय पाटील, राजेश सावंत, आनंद ढाकिफळे, दत्ता पाटील, प्राजक्त देशमुख यांच्या समितीने शिक्कामाेर्तब केले. या घाेषवाक्य आणि लाेगाेचे प्रकाशन मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या सरचिटणिस नीलिमा पवार आणि संचालक जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाेकहितवादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
असे आहे बाेधचिन्ह
पुस्तकरूपी रेषा म्हणजे साहित्य हे अनंताकडून अनंताकडे प्रवाहित हाेणारं आहे. त्याच्या मध्यातून दाखवेली लेखणी साहित्यातील समताेलाचं प्रतीक आहे. उगवीकडील पानांतून गाेदावीचा चैतन्यदायी प्रवाह...मग त्यात लाेकसंस्कृती, सामाजिक जाणीवा.. वगैरे, वगैरे...लेखणीचा केशरी रंग परि अमृताते ही पैजा जिंके सांगणाऱ्या ज्ञानाबांपासून आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने म्हणणाऱ्या तुकाेबांसह संतपरेंपरेतून मग पुढे सामाजिक जागर, क्रांती, सूर्याेदर क्षितीजाचं प्रतीक वगैरे... त्यातून दिसणारा सूर्य म्हणजे नवाेन्मेषी कल्पना, साहित्य स्त्राेतांचं प्रतीक. अग्रभागी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आेळी ‘मराठी साहित्य ही केवळ रंजनप्रधान गाेष्ट नसून ती समाजाला जगण्यासांी महत्त्वाचं ध्येय देण्याची अपार क्षमता असलेली आमची संस्कृती आहे’ म्हणूनच अनंत आमुची ध्येयासक्ती... या अधिक समर्पक, व्यापक अर्थ असलेल्या आेळी घाेषवाक्य म्हणून निवडल्याचे प्रसिद्ध करण्यात आले असले तरी सामान्याला मात्र हे सगळं त्या बाेधचिन्हाकडे बघून समजण्या पलिकडचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.