आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:94व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा मान अखेर नाशिकला; मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आयाेजन

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19, 20, 21 मार्चला संमेलन

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान अखेर नाशिकला मिळाला. स्थळ पाहणी समितीने गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी आैपचारिक घाेषणा केली जाऊ शकते. समितीने इतर काेणत्याही ठिकाणांची पाहणी न केल्याने संमेलन नाशिकलाच हाेणार हे निश्चित झाले. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संमेलन हाेण्याची शक्यता असून स्वागताध्यक्षपद पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

नाशिकला साहित्य महामंडळाचे कार्यवाह डाॅ. दादा गाेरे, काेषाध्यक्ष डाॅ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांनी गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

19, 20, 21 मार्चला संमेलन : २०२०-२१ या आर्थिक वर्षातच संमेलन घेण्यासाठी साहित्य महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. संमेलन मार्च महिन्यात १९, २० आणि २१ मार्च राेजी हाेणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मार्च महिन्याचा चाैथा आठवडाही संमेलनासाठी विचारात हाेता. मात्र २८ तारखेला हाेळी हा सण आल्याने त्याचा विचार मागे पडला.

२७, २८ फेब्रु. १ मार्च का नाही
कुसुमाग्रजांच्या नगरीत संमेलन हाेत आहे. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गाैरव दिन’ म्हणून साजरा केला जाताे. या वर्षी २७ तारीख ही शनिवारीच आलेली आहे. अर्थात सुटीचाच दिवस आहे. त्यामुळे या दिवशी संमेलन घेतले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल आणि कुसुमाग्रजांना ती एक मानवंदना ठरेल, असाही एक विचार यानिमित्ताने पुढे येत आहे.

मंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष : संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांची लुडबुड नकाे हा नियम उस्मानाबाद संमेलनात पाळला हाेता. नाशिकच्या संमेलनाचा मान मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना देण्याच्या विचारात आयाेजक आहेत. यंदा शासनाकडून संमेलनासाठी केवळ पाच लाखांचा निधी मिळणार आहे. भुजबळ स्वागताध्यक्ष झाले तर या निधीत थाेडी वाढ हाेऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser