आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान नाशिकला मिळणार असल्याच्या दिव्य मराठीच्या वृत्तावर शुक्रवारी शिक्कमोर्तब करण्यात आला आहे. स्थळ पाहणी समितीने गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली. समितीने इतर कोणत्याही ठिकाणाची पाहणी न केल्याने संमेलन नाशिकलाच होणार हे निश्चित झाले होते. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संमेलन होणार आहे. तसेच स्वागताध्यक्षपद पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या पत्रकानुसार, 94 व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरचे एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद्द संस्थेने फेरनिमंत्रणही पाठिवले होते. या फेर निमंत्रणात सरहद्दने मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणी केली होती. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेवटी नाशिकच्या लोकिहतवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 व्या साहित्य संमेलनासाठी त्याचीच निवड केली आहे.
24 जानेवारीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष निवडणार
नाशिकला साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच 24 जानेवारीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष निवडणार असे ठरवण्यात आले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातच संमेलन घेण्यासाठी साहित्य महामंडळाचा प्रयत्न सुरू होते. संमेलन मार्च महिन्यात 19, 20 आणि 21 होणार असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मार्च महिन्याचा चौथा आठवडाही संमेलनासाठी विचारात होता. मात्र 28 तारखेला होळी हा सण आल्याने त्याचा विचार मागे पडला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.