आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढत्या कोरोनाचा परीणाम:94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.

नाशिक येथे होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. 94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध पाळण्यास सुरुवात होत आहे. यानंतर नाशिक येथील अखिर भारतीय मराठी साहित्य संमेल स्थगित करण्याचा विचार संयोजक करत होते. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याविषयी विचारविनिमय सुरू होता. अखेर रविवारी नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

निवेदनात काय लिहिले आहे?

या महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याविषयीही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'कोरोनामुळे यावेळी संमेलन घ्यायचे नाही असे महामंडळाने ठरवले होते. मात्र 2020 च्या मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे आता हे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.'

बातम्या आणखी आहेत...