आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मालेगावात तैनात 96 पोलिस कोरोनामुक्त; नाशिक, औरंगाबाद-अमरावतीच्या पोलिसांचा समावेश

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभरात 1272 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग, 11 मृत्युमुखी

कोरोना संकटात मालेगावात कर्तव्य बजावताना बाधित झालेल्या ९६ पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. यात नाशिक ग्रामीणचे ४३, राज्य राखीव पोलिस दलाचे ४९ तर जिल्ह्याबाहेरील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री या सर्वांना सन्मानाने घरी सोडण्यात आले. बाधित पोलिसांचा आकडा दीडशे पार पोहोचल्याने वरिष्ठांनी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांची नाशिकला उपचार सुविधा केली होती. रविवारी ९६ कर्मचाऱ्यांना निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा देत रवाना केले. यात नाशिक ग्रामीणचे ४३, जालना ३८, औरंगाबाद ५, अमरावती राज्य राखीव पोलिस दलाचे ५, जळगावचे २, मरोळ व धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्राचा प्रत्येकी एक जवान पूर्णपणे बरा झाला गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ७ कर्मचाऱ्यांना घरी सोडले होते.

राज्यभरात १२७२ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग, ११ मृत्युमुखी

> कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील ७ पोलिस कर्मचारी व १ अधिकारी असे एकूण ८ जण तर पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ११ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.

> राज्यात १३१ पोलिस अधिकारी व ११४२ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली तर तातडीने उपचारांसाठी राज्यात नियंत्रण कक्ष स्थापन आहेत.

बातम्या आणखी आहेत...