आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरीचीबारी:आदिवासी पाड्यावर 97 निर्धूर चुली भेट ; रोटरी क्लब ऑफ नाशिक गंजमाळचा उपक्रम

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ तालुक्यातील बोरीचीबारी या आदिवासी पाड्यावर महिलांना चुलीच्या धुरापासून कायमची सुटका करण्यासाठी राेटरी क्लब आॅफ नाशिक गंजमाळच्या वतीने ९७ निर्धूर चुलींचे वाटप करण्यात आले. बोरीचीबारी येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक गंजमाळच्या वतीने या उपक्रम राबविण्यात आला.सीएसआर फंडाच्या माध्यमातून रोटरीने या आदिवासी पाड्यावरील ९७ कुटुंबांना निर्धूर चुलीचे वाटप केले. वर्षानुवर्षे या महिला पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करत हाेते. धुराने अनेक महिलांचे डोळे आणि अन्य आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. रोटरीने त्यांना सामाजिक बांधिलकीतून निर्धूर चुली देऊन त्यांची धुराच्या त्रासापासून कायमची मुक्तता केली आहे. या उपक्रमासाठी नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरेडीया ,सचिव ओमप्रकाश रावत यांचे सहकार्य लाभले. बोरीचीबारी येथील कुंभाळेचे माजी उपसरपंच मोहन कामडी, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ निकुळे, आदी उपस्थित हाेत. मुक्त विद्यापीठाच्या अर्चना देशमुख यांनी निर्धूर चुलीचा वापर कसा करावा याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...