आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये रंगणार 12 तास नाॅनस्टाॅप म्युझिकल मॅरेथाॅन:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विश्वास गार्डन, सावरकरनगर येथे रंगणार सोहळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांच्या नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022 चे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. विश्वास ग्रृप व गीतगुंजन प्रस्तुत ही म्युझिक मॅरेथाॅन रविवारी (ता. 11) विश्वास गार्डन, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे.

मॅरेथाॅनचे उद्घाटन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते आणि विश्वास ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत प्रेमींसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असल्याने उपस्थित राहण्याचे आवाहन व विश्वास ठाकूर व गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे भुषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी केले आहे.

साठहून अधिक कलाकार, 126 गाणी

सदर म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील 60 हून अधिक गायक-कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एकूण 126 गाणी सादर होणार आहेत. गाणी एकत्रितपणे व सलग न सादर होता, ती सहा वेगवेगळ्या थीमवर आधारीत असणार आहे.

अशी हाेणार म्युझिक मॅरेथाॅन

यामध्ये सकाळी 9 ते 11 अनमोल रतन, सकाळी 11 ते 1 जीना यहॉ मरना यहाँ, दुपारी 1 ते 3 हिटस् ऑफ 90, दुपारी 3 ते 5 दर्द ए किशोर, सायंकाळी 5 ते 7 फिल्मी गझल, संध्याकाळी 7 ते 10 हिटस् ऑफ आर. डी. बर्मन या क्रमाने होणार आहेत.

या कलाकारांचा सहभाग

या कार्यक्रमात मध्ये प्रणेता निकूंभ, भूषण कापडरे, श्रेयसी राय, नमिता राजहंस, सुवर्णा भालेराव, मुकुंद जाेशी, प्रशांत चंद्रात्रे, प्रियांका बढे, मनाेज बागुल, अलका सावंत, संजय साळवे, सुधीर बिरारी, चंद्रकांत साेनवणे, संजय रासकर, याेगेश कापडी, सुजय साेनार, बाळू कापसे, सुरेश काफरे यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...