आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे गंगापूररोडवरील निवारा गृहातून अपहरण झाल्याची तक्रार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर रोडवरील डॉन बॉस्को स्कूलशेजारील निवारा गृहात (शेल्टर) बाल समितीच्या वतीने शालेय शिक्षण व संरक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचे निवारागृहाजवळूनच अपहरण झाल्याचा संशय असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवारागृहाचे कर्मचारी जगदीश झरेकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे राहणारा सूरज (१२) हा आठवडाभरापूर्वी ३० मे रोजी दुपारच्या सुमारास निवारागृहातूनच बाथरूमला जाऊन येतो, असे सांगून बाहेर पडला. मात्र तो आतापर्यंत परतलेला नाही. त्याला काेणीतरी काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक एम.डी.पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या मुलाचे वर्णन रंगाने गोरा, केस काळे, उजव्या डोळ्यावर जखमेचे निशाण, अंगात आकशी निळसर रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची फुल पँट घातलेली व हिंदी भाषिक आहे. कोणाला आढळून आल्यास गंगापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक व मनमाड, शिर्डी भागाताही शोध घेऊनही तो आढळून आलेला नाही. यांसदर्भात, काहीही माहिती समजल्यास ९९२३८१०८४१ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...