आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:नाशिक जिल्ह्यात 19 वर्षीय वाॅर्डबॉयची दवाखान्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहोणेर (ता. देवळा) येथील इंद्रायणी क्लिनिकचे संचालक डॉ. संजय आहिरे यांच्या दवाखान्यात वार्डबॉय म्हणून कार्यरत असलेल्या विकास भगवान सोनवणे (वय १९) या तरुणाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दवाखान्यातील एका खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

विकास हा वार्ड बॉय म्हणून काम करत महाविद्यालयात शिक्षण घेत दवाखान्यात वास्तव्यास होता. रविवारी रात्रीचे जेवण करून तो झोपण्यासाठी गेला. सोमवारी सकाळी तो लवकर न उठल्याने त्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याने आवाज दिला. मात्र, खोलीचे दरवाजे आतून बंद असल्याने खिडकी उघडून पाहिली असता विकास याने नॉयलॉन दोरीने फाशी घेतली असल्याचे निदर्शनास आले. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात येथील पोलीस पाटील अरविंद उशीरे यांनी तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...