आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने त्यासाठी विवस्त्र पूजा करावी लागेल, असे सांगून भोंदू बाबाने विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर गावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाबा कामिल गुलाम यासिन शेख (रा. जामा मशीद गंगापूर गाव), स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (रा. कामटवाडे) व अशोक नामदेव भुजबळ (रा. सातपूर) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिघांविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना दिलेली माहिती आणि महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत पीडित विवाहितेच्या बहिणीचा मुलगा अाजारी असल्याने त्याला गंगापूर गाव येथील पठाडे गल्ली येथील मशिदीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेख याच्याकडे उपचारासाठी नेले जात हाेते. संशयिताने त्याचा फायदा घेत पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला महिलेने याकडे दुर्लक्ष केले. भोंदू आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिलेचा विश्वास संपादन करत तिला पूजा करण्यासाठी तयार केले.
मात्र एकदा ही पूजा झाल्यानंतर पैशांचा पाऊस पडेल असे सांगितले. प्रत्येक बुधवारी संशयिताने महिलेला विवस्त्र पूजा करण्यासाठी प्रवृत्त केले. असे तीन अाठवडे अत्याचार सहन केल्यांनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्याची दखल घेत तिघांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी (दि.१७) न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात अाले. वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू अाहे.
रॅकेट सक्रिय
शहर व परिसरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणारे रॅकेट सक्रिय असल्याचे या घटनेतून उघडकीस आले. यापूर्वी आनंदवलीमध्ये अशी घटना घडली होती. दुसऱ्या घटनेत औरंगाबाद रोडवर एका दुकानाच्या अावारात तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू ला आडगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.