आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार आहे. शहरातील विद्यार्थ्याना नवीन दप्तर, साहित्य मिळत असले तरी आदिवासी पाड्यांवरील गरजू, गरीब, वंचित मुलांना ते मिळत नाही. आर्थिक परिस्थिती अभावी अनेक मुलांना शिक्षणही अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उधाण युवा ग्रुपने यंदाही 'एक दप्तर मोलाचे' उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
उधाण युवा ग्रुपचे अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्याप्रमाणे अनाथ व मागास गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी ग्रुपतर्फे सध्या साहित्याचे संकलन केले जात आहे. पुढील काही दिवसांत शाळा पुन्हा एकदा गजबजणार आहे. नव्या वर्गाबरोबरच विद्यार्थी नवे दप्तर व नव्या शालेय साहित्यासह शाळेत प्रवेश करतील. पण, परिस्थितीने गरीब, मागास व अनाथ विद्यार्थ्यांना नवे दप्तर घेता येत नाही. त्यामुळे ते फाटलेले किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीत वह्या पुस्तके घेऊन जातात. त्यांना फाटलेले दप्तर घेऊन शाळेत जावे लागू नये यासाठी 'एक दप्तर मोलाचे' हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 9766247555 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दप्तर व शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन
या उपक्रमात सहभाग नोंदवून या कार्यात आपल्यालाही हातभार लावता येईल. सुस्थितीत पण विना वापरात असलेले दप्तर व शैक्षणिक साहित्य जमा करू शकतो. आपल्याकडील दप्तर व अन्य शालेय साहित्य लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन उधाण युवा ग्रुपचे जगदीश बोडके यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.