आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल वाजवून महापालिकेला मिळाले 35 लाख!:बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर दणदणाट; करवसूलीसाठी भन्नाट आयडीया

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे एक लाखाच्या पुढे थकबाकी असलेल्या घरपट्टी मालमत्ता धारकांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन पुन्हा एकदा दिवाळीनंतर सुरू झाले असून पहिल्याच दिवशी सुमारे 35 लाख 45 हजार रुपयांची वसुली झाली. गेल्या 14 दिवसात दिवाळी सुट्टीचा कालावधी वगळता सुमारे पाच कोटीची वसुली झाली असून आर्थिक खडखडाटाचा सामना करणाऱ्या महापालिकेला मोठी उभारी मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने होऊ द्या खर्च असे धोरण अवलंबल्यामुळे जुन्या कामांचे देणे जवळपास दोन हजार कोटीपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे महापालिकेला कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात घरपट्टी व पाणीपट्टीची अपेक्षित वसुली करता आलेली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक देणे,दिवाळीमध्ये ठेकेदारांची देयके देणे, सानुग्रह अनुदान अशा विविध कामांमुळे जवळपास शंभर ते दीडशे कोटींचा बोजा आला. ही बाब लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ऑक्टोबरपासून एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सव्वाचार कोटी पेक्षा अधिक वसुली झाली. त्यात सुरुवातीच्या तीन दिवसांतच एकूण 2 कोटी 74 लाख 30 हजार रुपयांची वसुली मनपाने केली.

येथे सर्वाधिक 15 लाख वसुल

1 नोव्हेंबर रोजी एकूण 35 लाख 45 हजार 89 रुपये रुपयांची कर वसुली झाली आहे. नाशिक रोड विभागात सर्वाधिक 15 लाख 49 हजारांची वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण 72 ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.

विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे

  • नाशिक पश्चिम – 0
  • नाशिक पूर्व – 3,25,000 रुपये
  • पंचवटी - 8,46,965 रुपये
  • नाशिक रोड- 15,49,126 रुपये
  • नवीन नाशिक- 7,67,828 रुपये
  • सातपूर - 56,198 रुपये
  • एकूण - 35 लाख 45 हजार 89 रुपये

थकबाकी भरा ; कटू कारवाई टाळा

''घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार आहे.'' -अर्चना तांबे, उपायुक्त

बातम्या आणखी आहेत...