आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:पार्किंगच्या वादातून हाणामारी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात दाेघांनी हातोड्याने मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात दोन्ही शेजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज परदेशी (रा. लाटेनगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, पार्टीकरीता मित्रासोबत गेलाे असता संशयित तानाजी कांडेकर, अजिंक्य कांडेकर ( रा. सावता माळीनगर) यांच्यासोबत कार पार्किंगवरुन वाद झाला होता. संशयित अजिंक्य कांडेकरने मित्रांना शिवीगाळ करुन लोखंडी कोयता दाखवत येथे वाहन पार्क केल्यास तुमचे तंगडे तोडून टाकेन, अशी धमकी दिली.

परदेशीचे मित्र हेमंत जोशी, विक्की कुवर यांना मारहाण केली. परदेशी समजावून सांगण्यास गेला असता लोखंडी राॅड परदेशीच्या डोक्यात मारत त्याला जखमी केले. रत्नप्रभा कांडेकर (रा. अमृतधाम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित वैष्णव उमप व त्याच्या आठ साथीदारांनी घरासमोर कार उभ्या केल्या तसेच कारने सायकल उडवून दिली. दुचाकी पार्किंग केल्याच्या कारणातून कुरापत काढून पती व मुलाला बेदम मारहाण केली. पतीच्या पाठीत हातााेडा मारुन त्यांना जखमी केले. त्या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांच्या हाताला दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...