आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; अश्लील फोटो व्हायरल केल्याचाही आरोप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित फिर्यादी व महिलेशी आरोपी समीर रामाशिष सिंह (वय 32 , रा. चाकण, ता. जि. पुणे) याने जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. दरम्यान, दि. 5 जुलै 2018 ते दि. 5 एप्रिल 2023 या कालावधीत आरोपी समीर सिंह याने पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करून त्या अत्याचाराचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो आरोपी सिंह याने पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात आरोपी समीर सिंह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संसद त तरुणाने महिलेची मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आहे प्रकार पुढे आला आहे.

या गंभीर प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा व सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल करून केला आहे या प्रकाराने परिसरात घडले असेल खळबळ उडाली असून संस्थेचा कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अंबड पोलिसांनी तातडीने संशयतास अटकेसाठी कारवाई केली आहे त्याच्या पथकासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.