आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:बंडखोरांविरुद्ध तगडा उमेदवार शोधण्याचे उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर गेले, मात्र जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे बंडखोरांना पराभूत करण्यासाठी एकजूट करावी, असा मंत्र देत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघात तगडा उमेदवार शोधण्याचे आव्हान स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेथे उद्धवसेनेकडे कार्यकर्ता उपलब्ध नसेल तर तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आयात करण्याचीही तयारी होत आहे. अवघ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांनी तयारी सुरू केली. त्याबरोबरच विधानसभा निवडणूकही होण्याची शक्यता लक्षात घेत त्यांनी नाशिक व दिंडोरी लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या १५ जागांसंदर्भात आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचाही आढावा घेतला. त्यात पाच बंडखोरांविरुद्ध उमेदवार शोधावे लागतील, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जानेवारी, फेब्रुवारीत मनपा निवडणूक होऊ शकतात, त्यामुळे रिक्त असलेल्या गटप्रमुख व बूथप्रमुखांच्या जागा भरा, असेही ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...