आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील भारतनगर येथील शिवाजीवाडी परिसरातील महापालिका शाळा क्र. ६७ च्या आवारातच झाेपड्यांचा वर्ग भरु लागला आहे. या भागात सध्या ३० ते ३५ अनधिकृत झोपड्या शाळेच्या प्रांगणात उभारल्या आहेत. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्षच आहे. शिवाजीवाडीतील महापालिकेच्या शाळेत अरुंद खोल्यांमध्ये विद्यार्थी दाटीवाटीने शिक्षण घेतात. गेल्या दहा वर्षांपासून नूतन इमारतीची प्रतिक्षा आहे. शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. पंधरा वर्षांपूर्वी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार शिवाजीवाडीतील मनपाच्या जागेला संरक्षक भिंत बांधून मनपाची शाळा सुरू करण्यात आली. सकाळी मनपाची मराठी शाळा क्रमांक क्रमांक ६७ व दुपार सत्रात उर्दू शाळा क्रमांक ६६ भरते. दोन्ही सत्रांत इयत्ता पहिली ते सातवीचे सात वर्ग आहेत.
शाळा षटकोनात बांधण्यात आली असून, सुमारे दहा बाय दहाच्या खोलीत वर्ग भरतात. प्रत्येक वर्गात ३५ ते ४० विद्यार्थी असून, दाटीवाटीने विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात. या शाळेला चहूबाजूने अनधिकृत झोपड्यांनी विळखा घातला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उरलेले नाही. तसेच अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आवाजामुळे, वादामुळे येथे चालत असलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आणि शिक्षकांना शिक्षण देताना होतो. महापालिकेने सर्वप्रथम येथील अतिक्रमण काढण्यासह शाळेची नूतन इमारत बांधण्याची मागणी करण्यात येत आहे.
कारवाई हाेणार
शिवाजीवाडीतील पालिकेच्या शाळेच्या आवारात झोपड्या वाढल्या असून अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावली असून यासंदर्भात शुक्रवारी पाहणी करत कडक कारवाई करणार आहाेत - राजाराम जाधव, विभागीय अधिकारी, महापालिका पूर्व विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.