आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिस्ट असोसिएशन:पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या मतपत्रिका प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याची तक्रार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या निवडणूक मतपत्रिकांचे गठ्ठे सिन्नरमधील दोन मेडिकल स्टोअर्समधून २ जून रोजी पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केले होते. याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवूनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने वैद्यकीय शिक्षण मंत्री, नाशिकचे पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते व विधानसभा उपाध्यक्षांकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरुध्द निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु झाली असून राज्यभरात ही निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. राज्यातून २ लाख ८५ हजार मतदार बॅलेटपेपर द्वारे मतदान करत आहे. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात असून दिनांक २३ मे ते १७ जुन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब करत असल्याचा प्रकार २ जुन रोजी सिन्नर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उघड झाला होता. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यामुळे सिन्नर मधील दोन मेडिकल स्टोअर्स मधून पोलिसांनी मतपत्रिका ताब्यात घेतल्या होत्या. या गंभीर प्रकाराला ६ दिवस उलटलेल असतानाही अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.

बातम्या आणखी आहेत...