आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सिडकोत खासगी रुग्णालयात डॉक्टरचा अल्पवयीन परिचारिकेवर अत्याचार

सिडकाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील मोरवाडी येथील ख‌ासगी रुग्णालयात चक्क डॉक्टरनेच अल्पवयीन परिचारिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. अंबड पोलिसांनी संशयित डॉक्टरला अटक केली आहे.संशयित आरोपी डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५०) याचे मोरवाडी येथे स्वामी हॉस्पिटल आहे. त्यात एक अल्पवयीन परिचारिका नाेकरीस होती. तिची राहायची व्यवस्था रुग्णालयातच वरच्या मजल्यावर होती.

डॉ. कुटे याने शनिवारी रात्री पीडितेच्या रूममध्ये प्रवेश करत हात पाय दुखत असल्याचे निमित्त केले. आणि तिच्याशी बळजबरी शारीरिक संबध केले. ही घटना कुणाला सांगितल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडिताने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस स्टेशन गाठत अन्यायाला वाचा फोडली. याबाबत अंबड पोलिसात बलात्कार, अॅट्राॅसिटी,पोक्साेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...