आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:लेखानगरला भाजी बाजारात पाचशे रुपयांची बनावट नोट ; भाजीविक्रेत्यांना भामट्याने दिली बनावट नाेट

सिडको5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील उपेंद्रनगर भाजी बाजारात दोन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने चार ते पाच भाजी विक्रेत्यांना पाचशे रुपयांच्या खोट्या नोटा देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर असताना, पुन्हा एकदा मंगळवारी सायंकाळी असाच प्रकार लेखानगर भाजी बाजारात घडला. मंगळवारी सायंकाळी लेखानगर भाजी बाजार येथे गंगुबाई साळवे या भाजी विक्रेत्यांना एका व्यक्तीने पाचशे रुपयांची खोटी नाेट देत भाजी खरेदी केली व तेथून पुढे निघून गेला. अशाच पद्धतीने त्याने दोन ते तीन भाजी विक्रेतांना खोटी नोट देत फसवणूक केली. दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार उपेंद्रनगर भाजीबाजारात घडल्यानंतरही अंबड पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा लेखानगर भागात खोट्या नोटा आणल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आम्ही सीसीटीव्हीचा शोध घेऊन माहिती घेत आहोत असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. शहरात पाचशेच्या बनावट नाेटा येत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...