आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाेरदार कारवाई:विनाहेल्मेट 554 दुचाकी चालकांकडून 2 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वाढलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये विनाहेल्मेट चालकांची संख्या वाढत असल्याने शहरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली. १ डिसेंबरला पहिल्याच दिवशी ५५४ विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आले. त्यांच्याकडून २ लाख ७७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याकारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई पुढे अधिक व्यापक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त पौर्णिमा चौघुले यांनी दिली.

अपघातांत विनाहेल्मेट दुचाकी चालकांची संख्या सर्वाधिक आहे. या अपघातांची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू केली आहे. पहिल्या दिवशी शहरातील स्वामी नारायण चौक, संतोष टी पाॅईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पाॅईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको काॅलेज समोर सकाळी १० ते १२ आणि ५ ते ७ या कालावधीत विनाहेल्मेट कारवाई करण्यात आली. उपआयुक्त चौघुले, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाच्या चार विभागांकडून ही कारवाई करण्यात आली.

हेल्मेट वापरा कारवाई टाळा
अपघातात मृत्यू, गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट वापर गरजेचा आहे. हेल्मेट वापर ही मजबुरी न समजता कर्तव्य आहे. स्वत:च्या सुरक्षेसह कुटुंबियांच्या सुरक्षेकरीता हेल्मेट वापर करा. कारवाई पुढे व्यापक स्वरुपात होणार आहे. हेल्मेट वापर करा कारवाई टाळा.- पौर्णिमा चौघुले, उपआयुक्त, वाहतूक शाखा.

बातम्या आणखी आहेत...