आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक:मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना उडाला आगीचा भडका, महिलेचा मृत्यू; वडाळागावातील दुर्दैवी घटना

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅनिटायझरमधील अल्कोहोलयुक्त पदार्थ मेणबत्तीच्या संपर्कात आल्याने भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज

मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाईझ करताना भडका उडाल्याने शहरातील वडाळागावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले.

वीज पुरवठा खंडित झाल्याने वडाळागावातील राहणार्‍या रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्याची घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या सोमवारी 20 जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती. मात्र 24 जुलै रोजी मध्यरात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेणबत्तीच्या संपर्कात सॅनिटायझरमधील अल्कोहोलयुक्त पदार्थ आल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.