आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा आनंद:उगावच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्याची भरली शाळा

उगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जाण्यासाठी घाबरण्याच्या वयातील मुलांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शिवाय व्यवसायात स्थिरस्थावर होत कुटुंबात नातवंडांसोबत रममाण झाले. तरीदेखील जुन्या शालेय आठवणी अन् दोस्तांसोबत गट्टी जमविण्याचा छंद एका दिवसाकरिता जोपासला अन् उगावच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील १९७८-७९ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले.

उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या १९७८-१९७९ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिवाळीचा मुहूर्त साधत सेवानिवृत्त पर्यवेक्षक एम. डी. वायकोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सरस्वतीपूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्कालीन सर्व शिक्षक, शिक्षिकांचा शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून उपस्थित विद्यार्थिनींना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. प्राचार्य कैलास गवळी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी बाकांवर बसून तर शिक्षकांनी हातात खडू घेऊन ज्ञानार्जनाचा आनंद लुटला.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक भा. का. कुशारे, कुळधरण, सावंत, घोडेकर, कडलग, गिते, पठाण, बिऱ्हाडे, चौधरी, पाटील, शेटे आदी सेवानिवृत्त शिक्षक कुसुम बोरसे, भागूबाई सानप, कमल पानगव्हाणे, छाया पानगव्हाणे, सुमन मेधणे, रेहाना शेख, बेबी पानगव्हाणे, निर्मला मोहाडकर, गंगूबाई पानगव्हाणे, मंदा ढोमसे, दिलीप बिरार, संजय नेहेरे, दिलीप पानगव्हाणे, दिनकर पानगव्हाणे, पंडित पानगव्हाणे, पंढरीनाथ सोनवणे, निसार शेख, रावसाहेब गवळी, रावसाहेब पानगव्हाणे, साहेबराव पानगव्हाणे, बाळासाहेब चव्हाण, साहेबराव गाजरे, शिवाजी वाबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...