आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवृत्त अधिकारी विनोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन करून 150 जणांना महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. यामध्ये 10 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
150 जाणांचा होता सहभाग
15 जून 1987 ते 31 मे 1988 या वर्षभरात नाशिकच्या पीटीसीमध्ये महाराष्ट्रातील 300 व गोव्यातील 28 युवकांनी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यात 30 मुलींची प्रथमच एमपीएससीद्वारा निवड झाली होती. त्या साऱ्यांना एकत्र आणून नाशिकला दोन दिवसांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. बहुतेकजण सेवानिवृत्त झाले. 46 जण दिवंगत झाले. मात्र, महिला अधिकाऱ्यांसह 150 जणांनी सहभाग नोंदवला.
अकॅडमीचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार म्हणाले, या स्नेहसंमेलनाने आपण सर्व एक आहोत याचा आनंद आहे. संचालक राजेश कुमार यांच्या हस्ते सर्वांना स्मरणचिन्ह देण्यात आले.1987 सालच्या बॅचच्या अनेकांनी वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावली. अनेकजण सन्मान पदक विजेते असून दोन महिलांना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला आहे.
भावना केल्या व्यक्त
आज 35 वर्षांनी पीटीसीत येताना सर्वांचाच ऊर अभिमानाने भरुन आला. यावेळी गोव्याहून आलेले महेश गावकर व महिला अधिकाऱ्यांतर्फे गोपिका जहागिरदार यांनी मनोगतात भावना व्यक्त केल्या. यावेळी सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी निशिकांत पाटील, शिवाजी शिंदे, शेखर तावडे ,जगन पिंपळे यांनी घेतले. वसतिगृहातील खोल्या, वाचनालय, जलतरण तलाव, आधुनिक फायरिंग रेंज, सिंथेटिक ग्राऊंड व विविध विभागांना भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.