आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:दराेड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टाेळीला सुरगाण्याजवळ अटक

बोरगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणाजवळील मोतीबागेजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. एकजण फरार झाला आहे.रविवारी रात्री आठच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याबाबत नाशिक ग्रामीणचे हवालदार दीपक अहिरे यांनी फिर्याद दाखल केली. आरोपी गणेश रामभाऊ जगताप (रा. नांदुर्डी, ता. निफाड), दीपक किसन जोर्वेकर (रा. संगमनेर), सीताराम ऊर्फ प्रमोद सोमनाथ कोल्हे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), प्रशांत शशिकांत अहिरे (रा. जेलरोड, नाशिक), सोमनाथ संजय भोये (रा. मुळाणे, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेतले. गोविंदा लक्ष्मण महाले (रा. सुरगाणा) हा फरार झाला. मोतीबागेजवळ रस्त्याच्या कडेला बोलेरो जीप (एमएच १५ इपी १७४६) व टाटा कंपनीची नेक्सान (एमएच १७ सीआर ५९८८) ही दोन वाहने संशयितरित्या उभी होती. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता पिस्तूल, जिवंत काडतूस, मिरची पूड, धारदार शस्त्रे, कटर, पाच मोबाइल, दांडके अशी हत्यारे आढळून आली. २९ लाख ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला होता. सहायक पोलिस निरीक्षक शिरोळे, पोलिस हवालदार सानप, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने कारवाई करत संशियांताना जेरबंद केले.

बातम्या आणखी आहेत...