आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भऊरच्या बँक ऑफ महाराष्ट्र अपहाराची होणार उच्चस्तरीय चौकशी

देवळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळा तालुक्यातील भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी भऊरला येणार असल्याची माहिती आ. राहुल आहेर यांनी दिली. आ. आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने (दि. ५) औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, व बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बँकेचे कार्यपालक विजयकुमार यांना निवेदन देण्यात आले.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या भऊर शाखेतील सफाई कामगार भगवान आहेर यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेवीदारांच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. यात तब्बल दाेन कोटी १० लाख ८० हजारांचा गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी संशयित भगवान आहेर, शाखा अधिकारी अमित शर्मा, कॅशियर आप्पा सोनवणे, तत्कालीन प्रोबेशनरी ऑफिसर आशिष सिंग, बँकमित्र संजय देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे सर्व संशयित सध्या कारागृहात आहेत. या गैरव्यवहारामुळे देवळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशांचा अपहार करण्यात आल्याच्या या प्रकारामुळे खातेदार, ठेवीदार चिंताग्रस्त आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, नितीन पवार, पोलिसपाटील भरत पवार, सुधाकर पवार, अण्णा पवार, शरद गरुड, राजेंद्र निकम, साहेबराव पवार, भाऊसाहेब वाघ, रवींद्र शिंदे, भाऊसाहेब निकम, दिलीप शेवाळे, साहेबराव शेवाळे, जितेंद्र आहेर, नंदू पवार, अमोल पवार, राहुल पगारे यांच्यासह भऊर, विठेवाडी, वरवंडी, खामखेडा येथील खातेदार उपस्थित होते. भऊर येथील बँकं आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना निवेदन देताना अमादार राहुल आहेर. समवेत किशोर चव्हाण, नितीन पवार, भरत पवार, सुधाकर पवार, शरद गरुड.

उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन देवळा तालुक्यातील भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील आर्थिक गैरव्यवहार हा गंभीर प्रकार असून परिसरातील शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा हडप करण्याच्या या प्रकाराची पाळेमुळे खणून काढली गेली पाहिजे. यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या आठ दिवसांत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. - डॉ. राहुल आहेर, आमदार

बातम्या आणखी आहेत...