आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरी करणाऱ्या गर्भवतीला भररस्त्यात प्रसूती कळा:स्थानिक महिला, डॉक्टरांनी धाव घेत केली सुखरूप प्रसूती; जुळ्या मुलींना जन्म

प्रतिनिधी | नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने पायी जात असतानाच मजूर महिलेला प्रसुती कळा सुरु झाली. परिसरातील महिलांच्या हा प्रकार लक्षात येताच महिलांनी परिसरातील डाॅक्टरांशी संपर्क साधून महिलेची रस्त्यातील झाडाखाली सुखरुप प्रसुती केली. महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. आई आणि दोन्ही मुलींना नगरसेविका प्रियंका माने यांनी खासगी रुग्णालयात दाखल करत सर्व जबाबदारी घेतली व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडले.

मुलींच्या जन्माचे स्वागत

औंदुबरनगर, अमृतधाम येथील रस्त्यावरुन मोलमजुरी करणारी गर्भवती शितल कांबळे आज दुपारी 12.56 वाजता रस्त्याने पायी जात होती. तेव्हाच तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. ती रस्त्यावरील झाडाखाली बसली. ही बाब परिसरातील महिलांच्या निदर्शनास आली. महिलांनी तत्काळ परिसरातील डाॅ. राजेंद्र बोरसे आणि नगरसेविका प्रियंका माने यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. डाॅ. बोरसे आणि नगरसेविका माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांच्या मदतीने डाॅ. बोरसे यांनी रस्त्यावर गर्भवतीची सुखरुप प्रसुती केली. महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. महिलांनी टाळ्या वाजवून मुलींच्या जन्माचे स्वागत केले. माने यांनी परिसरातील महिलांचे अभिनंदन केले.

लोकप्रतिनिधींची संवदेनशीलता

महिलेची रस्त्यावर प्रसुती होत असताना नगरसेविका माने यांनी मनपा आरोग्य केंद्राचे डाॅ. बस्ते, परिचारीका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनातून घटनास्थळी आणले. पंचवटी वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय देवकर यांच्याशी संपर्क साधून प्रसुतीची माहिती दिली. धनंजय माने यांनी रुग्णवाहिका बोलावून प्रसुत महिला व जुळ्य मुलींना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...