आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या जेरबंद:पाथर्डीत बिबट्या अडकला पिंजऱ्यात

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी गावातील मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली होती. या दहशतीखालीच शेतकरी व नागरिकांना कामे करावी लागत होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून नवले मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात अखेर रविवारी पहाटेच्या वेळी बिबट्या जेरबंद झाला. या परिसरात एक बिबट्या व दाेन बछडे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पाथर्डी गावातील भगवंत नवले यांच्या मळ्यात १५ दिवसांपूर्वी पिंजरा ठेवला होता. रविवारी पहाटे पिंजऱ्यात बिबट्या अडकला. जयेश नवले सकाळी मळ्यात गेले असताना बिबट्या जेरबंद झाल्याचे समजले. त्यानंतर या ठिकाणी विष्णू नवले, धीरज नवले, पोपट नवले, रोशन नवले, गणेश नवले तसेच यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.

अजूनही तीन बिबट्यांचा वावर, पिंजरा लावावा
बिबट्या जेरबंद झाल्याने पाथर्डीतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अजूनही या भागात एक नर व दोन बछड्यांचा वावर असल्याचे आम्ही पाहिले आहे. बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम आहे. त्यामुळे वनविभागाने पुन्हा पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे. - भाऊसाहेब नवले, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...