आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या जेरबंद:तळेगाव शिवारात मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

इगतपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर हद्दीतील तळेगाव शिवारात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दरम्यान, वन विभागाचा बिबट्याला जेरबंद करतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. १० वर्षीय आजारी बिबट्याचे सोमवारी (दि. २) सकाळी १० वाजता फिरायला गेलेल्या नागरिकांना दर्शन झाले होते.

बिबट्याचा मुक्त संचाराची चित्रे कॅमेऱ्यात देखील कैद झाली होती. मात्र, अशा प्रकारे बिबट्याचा मुक्तपणे संचार पाहिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बिबट्याला पाहून भयभीत झालेल्या नागरिकांनी तात्काळ या घटनेबाबत वन विभागाला माहिती कळवली असता वन विभाग घटनास्थळी दाखल झाले. जाळीच्या साह्याने वन विभागाचे अधिकारी चेतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब राव, शैलेंद्र झुटे, वनरक्षक सय्यद, गुव्हाडे, लोखंडे, बागुल, गांगुर्डे, जाधव वाहनचालक मुज्जू शेख यांनी बिबट्याला जेरबंद केले.

बातम्या आणखी आहेत...