आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घबराटीचे वातावरण:फाळके स्मारकाशेजारी‎ भिंतीवर दिसला बिबट्या‎

इंदिरानगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या‎ फाळके स्मारकाशेजारी नवीन उभारण्यात येत असलेल्या‎ सुमनचंद्र बिल्डिंगच्या संरक्षण भिंतीवर रविवारी (दि.५)‎ रात्री नऊच्या सुमारास बिबट्या मुक्त संचार करत‎ असल्याचे आढळून आले.

प्रत्यक्षदर्शींनी तातडीने वन‎ विभागाला कळविले. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण‎ पसरले आहे. याआधीही नवीन झालेल्या हॉटेलच्या‎ परिसरात पांडवलेणीच्या पायथ्याशीच बिबट्यांचे मुक्तपणे‎ संचार झाल्याचे याआधीही दिसून आले आहे. त्यामुळे‎ रात्री अपरात्री बाहेर जाताना घबराटीचे वातावरण आहे.‎ येथे यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले हाेते. पिंजरा देखील‎ लावण्यात आला हाेेता.‎

बातम्या आणखी आहेत...